वाहतुक व आरोग्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिने कलावंत विवेक ओबेरॉय यांना दंड
![](https://loksparsh.com/wp-content/uploads/2021/02/WhatsApp-Image-2021-02-19-at-9.35.35-PM-560x1024.jpeg)
मुंबई डेस्क, दि. 19 फेब्रुवारी: वाहतुक तसेच आरोग्य सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी प्रसिद्ध सिने कलावंत विवेक ओबेरॉय यांच्याकडून मुंबई पोलिसांनी 500 रूपये दंड केला आहे.
प्रसिद्ध सिने कलावंत विवेक ओबेरॉय हे मुंबईच्या रस्त्यावर विना हेल्मेट आणि विना मास्क PB 65 AH 9103 ही दुचाकी चालवत असल्याबाबत पुराव्यानिशी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बिनू वर्गीस यांनी ट्विटर द्वारे मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून मुंबई पोलिस वाहतुक शाखेकडून प्रसिद्ध सिने कलावंत विवेक ओबेरॉय यांना दंड करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत डाॅ वर्गीस यांनी समाधान व्यक्त केले असुन कोविड कालावधीत आरोग्य सुरक्षितेतचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई महानगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Comments are closed.