Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कल्याण डोंबिवलीतील 48 इमारती पुढील 10 दिवसात खाली करण्याची नागरिकांना नोटीस, 6500 रहिवासी होणार बेघर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातल्या बोगस महारेरा प्रकरणातल्या 48 इमारतीतल्या रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरे खाली करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे आता या परिसरातले साडेसहा हजार रहिवाशी बेघर होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने कडून ही नोटीस देण्यात आली आहे. तर मनपा आणि पोलिसांकडून घरे खाली करण्यासाठी धमकावले जात असल्याचाही आरोप रहिवाशांनी केला आहे.

बिल्डरने फसवणूक करून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खोटे दस्तऐवज सादर करत रेरामध्ये नोंदणी केल्याने 65 इमारती कारवाईच्या रडारवर आल्या आहेत. मात्र आता चार वर्षांनी ही बाब लक्षात आल्यानंतर तिथे घरं घेतलेल्या नागरिकांची यात काय चूक असा प्रश्न नागरिक करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इमारतींवर बुलडोझर चालवण्याआधी आमच्यावर बुलडोझर चालवा. मात्र आम्ही घरे खाली करणार नाही असा पवित्रा आता रहिवाशांनी घेतला आहे. तसेच या रहिवाशांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या सोबत चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दीपेश म्हात्रे यांनीही आपण या पीडित रहिवाशांच्या बाजूने ठामपणे उभे असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालिका आयुक्तांना भेटून या संपूर्ण प्रकरणात तोडगा काढणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

या प्रकरणात उच्च न्यायालयानं तीन महिन्यात 65 इमारती तोडण्याचा आदेश दिला आहे त्यापैकी काही तोडून झाल्या आहेत, तर अजून 48 इमारती तोडणे बाकी आहे. मात्र काही इमारतधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानं, या इमारती तोडता आल्या नाहीत. मात्र आता न्यायालयानं याचिका धारकांची ही याचिका फेटाळल्याने या 48 इमारतींवर हातोडा पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

न्यायालयाच्या आदेशानुसार इमारती तोडण्याची प्रक्रिया सूरु आहे. नागरिकांना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात अली आहे. तसंच पोलिसांच्या मदतीने इमारती खाली करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेराला मनपाच्या खोट्या साक्षऱ्या करून रजिस्टर केल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.