कॉलेजं लवकरच सुरू होणार, उदय सामंत यांची माहिती
उद्या कुलगुरुंसोबत बैठक झाल्यानंतर पुढचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई 31 जानेवारी :- आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची भेट घेतली. ‘उद्या ऑनलाइन पदवी प्रदान सोहळा राज्यपाल यांच्या उपस्थितीत होणार आहे या बद्दल राज्यपाल यांची भेट घेतली. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांनी राज्यपालांना माहिती दिली. तसेच आता कॉलेजेस सुरू करण्याची वेळ आली आहे. त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
उद्या कुलगुरुंसोबत बैठक झाल्यानंतर प्रत्येक विद्यापीठाची कॉलेज सुरू करण्यासंदर्भात काय तयारी आहे याचा आढावा घेणार आहे. एक दोन दिवसात या गोष्टी स्पष्ट होतील. उद्या होणाऱ्या चर्चेची माहिती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना देणार आहे. कॉलेज लवकरच सुरू होतील पण विद्यार्थी आणि कर्मचारी यांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची आहे.
Comments are closed.