सूर्य डोंगरी शिवारातील रानटी हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मंजूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वडसा वन विभागातील सूर्य डोंगरी शिवारात रानटी हत्तींनी केलेल्या मका पिकाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली असल्याची माहिती वडसा वन विभागाचे उप वन संरक्षक वरुण बी. आर. यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सुर्यडोंगरी शिवारात १८ मार्च २०२५ रोजी हत्तींनी देविदास बालाजी मेश्राम यांच्या शेतात मक्याचे नुकसान केले. त्यांना पोर्ला वनपरिक्षेत्रामधील कर्मचारी, कृषी सहायक, तलाठी यांनी तात्काळ पंचनामा करून वडसा वन विभागास प्रकरण सादर केले. वन विभागाच्या उपवनसंरक्षक वडसा कार्यालयने दि. 26 मार्च 2025 रोजी शेतकरी श्री. मेश्राम यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
तसेच, वडसा वनविभागाकडून शेतपिक नुकसान भरपाई प्रकरणे योग्य त्या शासन निर्णयांना अनुसरुन लवकरात लवकर अदा करण्यात येत आहेत, असे उपवन संरक्षक वरूण बी. आर. यांनी कळविले आहे.
Comments are closed.