Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मत्स्यपालन व्यवसायाच्या अंतर्गत रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधीबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.29 जून: सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्य व्यवसायाचा हा महत्वाचा वाटा आहे. या व्यवसायाव्दारे आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरीता रोजगार मिळविण्यासाठी मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायाचे विविध क्षेत्रांत आधुनिक पध्दतीने विकास कसा करता येईल या दृष्टीकोनातून जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली आणि मत्स्यव्यवसाय कार्यालय,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक.30.06.2022 रोजी वेळ दूपारी 12.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्र.2,कॉम्प्लेक्स,गडचिरोली येथे मत्स्यपालन व्यवसायाच्या अंतर्गत रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधीबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

सदर सत्रांकरीता मत्स्यव्यवसाय कार्यालयाचे सहायक आयुक्त, शुभम कोमरेवार हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लाभणार असून सदर समुपदेशन सत्राला रोजगार व स्वयंरोजगार करण्यास इच्छूक असलेल्या सर्व उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्र.2,कॉम्प्लेक्स,गडचिरोली येथे व्यक्तिश: उपस्थिती दर्शवावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

4 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.