Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेस पक्षाचे सरकार येताच विदर्भावर अन्याय :- आ.श्वेता महाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चिखली, 31 ऑक्टोबर

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या ढगफुटी सारख्या सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकट्या चिखली तालुक्यात साठ हजार हेक्टर पैकी तब्बल चाळीस हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. उडीद, मूग ही पिके तर अगोदरच हातातून गेली. सोयाबीन सतत पंधरा ते वीस दिवस पाण्यातच राहिल्याने सडून गेली आहेे. त्यामुळे काही शेतकर्‍यांचा कापणीचा खर्चही निघणार नसल्याने सोयाबीन कापणी करण्यापेक्षा रोटव्हेटर फिरवले. तरी सुद्धा शासनाने अतिशय मोजक्या शेतकर्‍यांना मदतीस पात्र ठरवून जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याची थट्टा या काँग्रेसी सरकारने केली आहे, असा आरोप आ. श्वेता महाले यांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विविध योजनेतून कोट्यवधी रुपयांची विकास कामे खेचून आणली होती. परंतु हे दळभद्री बिघाडी काँग्रेसचे सरकार आल्याबरोबर त्यांनी मंजूर कामे रद्द केली. कामांवर आलेला निधी परत घेतला. सरकार हे मायबाप असते. पालक म्हणून भूमिका निभावते. परंतु या सरकारने काही दिले तर नाहीच उलट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला निधी परत घेतला आहे. काँग्रेसचे सरकार आल्याबरोबर विदर्भावर अन्याय सुरू झाल्याचा घणाघाती आरोप करून शेतकर्‍यांवरील अन्याय दूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील आ.श्वेता महाले यांनी दिला आहे.पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानी- बाबत आ.श्वेता महाले यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन मदत देण्याची मागणी केली.

Comments are closed.