समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचारी यांनी केले वेतन वाढीसाठी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 12 जुलै – मागील 6 वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांना वेतन वाढ नाही. वाढत्या महागाईनुसार शासन नियमित कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय काढत असते. जिल्ह्यासह अहेरी, एटापल्ली येथील कंत्राटी कर्मचारी मागील सहा वर्षांपासून विनावेतनवाढ नसल्याने तोंड दाबून बुक्क्याचा मार खाणारे हे कंत्राटी कर्मचारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करून निषेध व्यक्त केला आहे.भारत सरकारच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प समग्र शिक्षा आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समग्र शिक्षा मधील सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी आज दिनांक 12 जुलै रोजी आपापल्या तालुक्यातील कार्यालयासमोर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून पगारवाढीची आणि अनुभवावर आधारित वेतन निश्चितीची मागणी केली. त्यानुसार गट साधन केंद्र, अहेरी व एटापल्ली येथील कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयासमोर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानिक मार्गाने आपली व्यथा शासनापुढे मांडली.
राज्यात 6500 कंत्राटी कर्मचारी सहा वर्षापासून वेतन वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. रक्ताचे पाणी करून दिवस-रात्र मेहनत करीत उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. सन 2021 22 च्या शैक्षणिक निर्देशांकात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे आहे. पण या कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याच्या बाबतीत या प्रकल्पाचे राज्य कार्यालय उदासीन दिसून येत आहे. शासन नियमित कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढविण्याचा शासन निर्णय काढते. मात्र कंत्राटी कर्मचारी यांच्या सोबत शासन दुजाभाव करत आहे. याची झळ या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या एकूणच परिस्थितीला प्रभावित करते.
याचाच निषेध संविधानिक मार्गाने करण्यासाठी आज गट साधन केंद्रअहेरी व एटापल्ली च्या समग्र शिक्षाच्या कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकीचे वाचन करून केले. यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे यांना निवेदन देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.सदर कर्मचाऱ्यांची मागणी यावेळी तरी शासन पूर्ण करेल अशी आशा या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.