अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची १५ टेबलवरून होणार मतमोजणी, उमेदवारांंची उत्सुकता शिगेला
अहेरी, दि. २१ जानेवारी: अहेरी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान 20 जानेवारीला पार पडले असून २२ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजतापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपल्ली येथे मतमोजणी पार पडणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया ही १५ टेबलवरून पार पडणार आहे. यामध्ये १४ टेबलावर प्रत्यक्ष मतमोजणी व १ टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी 100 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी च्या टेबलावर सरासरी २ कर्मचारी असणार आहे.स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम ची ने-आण करण्यासाठी १६ कर्मचारी असणार आहे. तर स्ट्राँग रूम मध्ये १० कर्मचारी असणार आहे.
मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. मतमोजणी केंद्राच्या आत प्रवेश करतांना आरोग्य पथकाद्वारे तपासणी करूनच आता पाठविण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान कोविड ची शंका आल्यास प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
तालुक्यातील ७२३ उमेदवारांना ओळखपत्र देऊन त्याच ग्रामपंचायती च्या मतमोजणी च्या वेळी त्यांना आत पाठविण्यात येणार आहे. या सर्व मतमोजणी प्रक्रियेवर नियंत्रण तालुका निवडणूक अधिकारी तथा अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांचे असणार आहे.
Comments are closed.