Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासीकरिता गावात पदवी चे शिक्षण

गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठ आपल्या गावात उपक्रम-जगप्रसिद्ध तज्ञांचे मार्गदर्शन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 9 जून – गडचिरोली सारख्या आदिवासीं बहुल जिल्ह्यात पूर्णकलिन महाविद्यालया शिवाय दर्जेदार पदवी शिक्षण कसे देता येईल? तेही गावातील लोकांचा व्यवसाय किंवा रोजगार बुडू न देता. याचा शोध घेत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रंशात बोकारे यांच्या संकल्पनेतून एक आगळा – वेगळा उपक्रम सुरू झाला विद्यापीठ आपल्या गावात. रात्री ६ ते ९ या वेळेत विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन तज्ञ प्राध्यापक वर्ग घेत आहेत. या अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्ट्स ची पदवी दिली जाणार आहे.हा उपक्रम राबविणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पाहिलं विद्यापीठ आहे.

गोंडवाना विद्यापीठ नाविन्याचा ध्यास घेत आपल्या अभिनव उपक्रमांनी गडचिरोली सारख्या संवेदनशील जिल्ह्यातल्या दुर्गम गावात आधुनिक ज्ञानाच्या समृद्ध गंगेचा प्रवाह वाहावत आहे. कमावत्या माणसाचं कौशल्य वृद्धिंगत करणे आणि नव्या माणसांना कमावण्या योग्य बनविणे हा यामागचा उद्देश आहे. याच उद्देशाला घेउन कुलगुरू प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आदिवासींची अलम दुनिया बदलावी म्हणुन गडचिरोली जिल्ह्याला बांबुच्या जंगलाचा समृद्ध वारसा लाभला आहे. इथला बांबु अत्यंत उत्कृष्ठ दर्जाचा असल्याचे मानल्या जातो. इतक्यातच तो मर्यादित झालाय. बांबूच्या कलाकुसरीचे उपजत ज्ञान आणि जाण सुध्दा इथल्या आदिवासीं समुदायात आहे. त्यांच्या याच उपजत कौशल्याला आधुनिक ज्ञान आणि कौशल्याची जोड देऊन त्यांना कुशल कारागीर, व्यवसायीक आणि उद्योजक म्हणुन सन्मानाने उभे करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ पुढें सरसावले आहे. त्यामुळेच बीए कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात बांबू क्रॉफ्ट चा जाणीवपूर्वक सामावेश केलाय. बांबू हे फ्युचर मटेरियल असुन यातुन पदवी शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्यांचे फ्युचर कसे बनविता येईल यातुन हा प्रयोग साकार झाला आहे.

जगप्रसिध्द तज्ञ पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या दारी
मार्च महिन्यात ज्यांना इंग्लंड देशाच्या संसदेत शी इंसपिरेस पुरस्कार देण्यात आला. अश्या जगप्रसिद्ध बांबू प्रशीक्षक पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचल्या आहेत. गेल्या ६ वर्षात ३ राज्यातल्या ११०० हून अधिक आदिवासीं-वंचीत महिलांना ज्यांनी प्रयोगशील बांबु कलेचे धडे दिले. अश्या “द बांबु लेडी ऑफ महाराष्ट्र” मीनाक्षी मुकेश वाळके जांभळी गावात विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमा अंतर्गत बांबू डिझाईनिगचे प्रशिक्षण देण्यासाठी सेवारत झाल्या आहेत . बांबू डिझाईन मध्ये ५ नवे प्रयोग, बांबु क्युआर कोड स्कॅनर हा देशातील पहिला मॉडेल साकारणाऱ्या मीनाक्षी वाळके यांनी जगभर बांबू राखी लोकप्रिय केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काय आहे विद्यापीठ आपल्या गावात उपक्रम
गोंडवाना विद्यापीठाद्वारे उन्नत भारत अभियाना अंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालयाव्दारे आयोजित ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमाच्या माध्यमातून जांभळी या ग्रामपंचायतीमध्ये महाविद्यालय सोडलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून २२विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात आली आणि त्या विद्यार्थ्यांना बी. ए. या पदवी अभ्यासक्रमामध्ये पुनरप्रवेशीत करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हे पण वाचा :- 

Comments are closed.