राष्ट्रसंतांबाबत चुकीचा मजकुर वगळण्याची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २२ डिसेंबर: ‘शब्दसाधना’ पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी चुकीचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. ते चुकीचे संदर्भ या पुस्तकातून तातडीने वगळण्यात यावे, अशी मागणी रातुम नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत विचारधारा अभ्यास मंडळाचे सदस्य व श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली आहे.
रक्षक यांनी म्हटले आहे की, भगवान गौतम बुध्द म्हणतात, ‘अत्त दीप भव:’, अर्थात स्वयंप्रकाशीत व्हा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार स्वयंप्रकाशीत होते. त्यांच्या जीवनावर व्यक्ती पूजेचा प्रभाव नव्हता. सत्य जीवनविचाराचे ते उपासक होते. त्यांची प्रेरणा कष्टकरी माणूस होता. व्यक्तीला त्यांनी कधीच गुरूस्थानी मानले नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वाणीज्य प्रथम वर्षाच्या ‘शब्दसाधना’ पुस्तकात राणा यांचा लेख अभ्याक्रमात आहे.
‘समतेचे वारकरी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज‘
‘समतेचे वारकरी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या लेखात अशोक राणांनी काही चुकीचे विधाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबदल आहेत. रातुम नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रा. अशोक राणा यांच्या शब्दसाधना पुस्तकातील चुकीचे संदर्भ गाळण्यात यावेत. राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा एम.ए. अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता मीळावी म्हणून प्रयत्न करून हा विभाग सक्षम करून जास्तीत विद्यार्थी संख्या राष्ट्रसंत विचारधारेच्या अभ्यासक्रमात सहभागी होतील, असा प्रयत्न विद्यापीठस्तरावरून करण्यात यावा, अशी मागणी अभ्यास मंडळाचे सदस्य रक्षक यांनी केली आहे.
Comments are closed.