Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धारावी पोलिस ठाणे ने सोन साखळी चोरी करणाऱ्या आरोपी ना केले अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 02, डिसेंबर :- धारावी पोलीस ठाणे यांनी सोन साखळी चोरांना शिताफीने अटक करून गु.र.क्र. 1323/2022 कलम 392,34भा.दं.वि. गुन्हा नोंदवून हसन उर्फ नुर मो. शेख उर्फ पाशा, वय 31 वर्षे, रा. ठी. रूम नं.202, शहीद भगत नगर, कुंभार वाडा, धोबी घाट, धारावी, मुंबई 17. मो. रफिक हाजी मोहंमद शेख वय 36 वर्षे, रा. ठी. रूम नंबर 661, शहीद भगत सिंग नगर, कुंभार वाडा,60 फुट रोड, धारावी, मुंबई याना अटक केली आहे.

या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 30/11/2022 रोजी 14:45 वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या राहते घरासमोरून धोबी घाट ब्रिज कडे जाणारी गल्ली या ठिकाणी जात असताना नमूद दोन आरोपी त्यांनी संगणमत करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून चोरी केली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून धारावी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1323/22 कलम 392,34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कांदाळगावकर , सहा.पोलीस निरीक्षक श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कदम व पथकाने नमूद गुन्हा दाखल झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून गुप्त माहितीच्या आधारे अनोळखी आरोपीचे नाव निष्पन्न करून सदर आरोपीताना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण व सखोल तपासातून नमूद गुन्हयातील चोरीस गेलेली सोन्याची साखळी (अंदाजे किंमत ५०,०००/- रुपये )हस्तगत करून नमूदचा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली.

यापूर्वी आरोपी क्रमांक दोन धारावी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1033/22 कलम 3,25 भा. ह. का. सह 37(1)(अ ) सह 135 म. पो. का.दाखल आहेत. तपासी अधिकारी।पो. उप. निरीक्षक घाडगे पुढील तपास करत आहेत. सदर चा तपास सपोनी वैभव कदम, पोलीस हवालदार अंगरक , पोलीस शिपाई चंदनशिवे , गणेश भरगुडे व विजय साळवी यांनी व.पो.नि. – विजय कांदळगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक धारावी पोलीस ठाणे मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात… समेळगावाला अनधिकृत मोबाईल टॉवरचा विळखा

नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावे

Comments are closed.