ना. विजय वड्डेटीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने रुग्णाना फळ वाटप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १२ डिसेंबर:- महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री ना. विजय वड्डेटीवार यांच्या आज वाढदिवसा निमित्याने आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले.
अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या शुभ हस्ते फळ वाटप करण्यात आले. यावेळी महागाँव येतील उपसरपंच श्रीनिवास आलाम, खाँदला ग्राम पंचायतचे सदस्या वंदना अलोने, राजाराम ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, सिरोंचा पं.स.चे माजी पं.स.सदस्य चँद्रु तोड़ासाम, आदिवासी विध्यार्थी संघाचे अहेरी शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, कवडु नवले, मिलिंद अलोने, गणेश चौधरी सचिन मैदावार, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक, विलास गलबले आदि उपस्थित होते.
Comments are closed.