Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा 2) अंतर्गत जिल्ह्यातील 36 हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप

घरकुले तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली: घरकुलासाठी पहिला हप्ता प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आपली घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच त्रयस्त व्यक्तींच्या कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी न पडता अडचणीसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा 2) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 36,070 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे ऑनलाइन वाटप आज करण्यात आले. तसेच, 15 हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. हा सोहळा आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी संपूर्ण आयोजनाची माहिती दिली. तसेच, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

घरकुल मंजुरी प्रमाणपत्र वाटपाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम बालेवाडी, पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. याचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखवण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावरही लाभार्थी आणि ग्रामस्थांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.