Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मिहीर फाऊंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण

मिहीर मेश्राम याच्या जन्मदिनी "मिहीर फाउंडेशन" चा गडचिरोलीत अनोखा उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

प्रतिनिधी – सचिन कांबळे 

जन्मदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आनंदी क्षण असतो, प्रत्येकांना आपला जन्मदिवस अपल्या इष्ट मित्रासह साजरा करण्याची हौस असते व जन्मदिवशी मौज करायला सर्वांना आवडत असते. परंतु गडचिरोली जिल्हातील मेश्राम कुटुंबाने आपल्या मुलाच्या जन्मदिवशी गरजु विदयार्थ्यांना स्कूल बॅग चे वितरण करून एकअनोखा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमाने सर्वत्र परिसरात कौतुक केल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. ३० नोव्हेंबर : गडचिरोलीत राहणाऱ्या मेश्राम दांपत्याने आपल्या  मुलाच्या (मिहिर) जन्मदिवसाचे औचित्य साधून मीहीर फाउंडेशन मार्फत गडचिरोलीतील महात्मा गांधी नगर पंचायत शाळेत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूलबॅग चे वितरण करून ३० नोव्हेंबर रोजी मिहिरचा जन्मदिन साजरा केला. 

मिहीर मेश्राम या २२ वर्षीय मुलाचे तीन महिन्यापूर्वी नागपुर येथे दुचाकीने झालेल्या अपघातात निधन झाल्याने मेश्राम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. परंतु मेश्राम कुटुंबाने या दुःखावर मात करीत मिहिर च्या जन्मदिनी गरजूवंत विद्यार्थ्यांना स्कूलबॅग चे वितरण करण्याचा निर्धार केला व स्तुत्य असा उपक्रम घडवून आणला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिहीर मेश्राम चे वडील भास्कर मेश्राम हे आयटीआय मध्ये गटनिदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्याची आई  शिक्षिका आहे. त्याच्या बहिणीचे एमबीबीएस या वैद्यकिय पदवीचे शिक्षण पूर्ण  झाले असून तिचे पुढील शिक्षण सुरू आहे. मिहीर हा लहान आणि खूप लाडका मुलगा असल्याने त्यांच्या वडिलांनी आपल्या संस्थेचे नाव “मिहीर फाऊंडेशन” ठेवले आहे.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अँड.राम मेश्राम यांची उपस्थिती होती.

मिहीर फाऊंडेशन चे अध्यक्ष भास्कर मेश्राम (मिहीर चे वडील), उपाध्यक्ष अँड. विप्लव मेश्राम, सचिव डॉ.मृणाली मेश्राम, सहसचिव सीमा तेलंग, कोशाध्यक्ष मंगला रामटेके, सदस्य वर्षा गेडाम, रोशन मेश्राम , बाळकृष्ण बांबोळे, कचरुजी गेडाम, गुरूदास लोणारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष विलास निंबोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्कर मेश्राम यांनी ही संस्था समाजातील गरजू लोकांच्या शिक्षण व आरोग्य या समस्यांवर काम करेल असे आश्वासन दिले.

भास्कर मेश्राम यांच्या संस्थेचा हा पहिला उपक्रम नसून त्यांनी या अगोदरही कोरोनाच्या काळात गोरगरीब, गरजूवंतांना अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे. इतकेच नव्हे तर भामरागड सारख्या अतीदुर्गम भागात जेव्हा अतिृष्टीमुळे झाली त्यावेळेस तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असताना त्यांनी तिथे जाऊन गरजू लोकांना अन्नदान, कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले होते. भास्कर मेश्राम यांची संस्था सेवाभावी असून गडचिरोली जिल्हयात या संस्थेने लोकांचा मनात ठसा उमटवला आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप बुरांडे, मुख्याध्यापिका प्रतिभा साळवे मॅडम, काळे मॅडम, बन्सोड सर, राजगडे मॅडम तसेच देवयानी तेलंग, शांताबाई गेडाम,पूजा गेडाम, वर्षा बांबोळे, पायल डोर्लीकर, सुमीत तेलंग, डॉ.नितेश सोनटक्के, डॉ.डिंपल नैताम, मंजूश्री रायपूरे व शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

हे देखील वाचा : 

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

जे.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी 19 कोटी रूपये मंजूर

रेल्वे राज्यमंत्र्यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला

 

Comments are closed.