नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील दिव्यांग महिला सरपंच करीत आहे समाजाची सेवा
नाशिक, दि. ३ फेब्रुवारी: समाजाच्या हितासाठी गावाच्या विकासासाठी चांगले काम करण्याची तळमळ असेल तर परिस्थितीला शरण न जाता कोणत्याही अडचणीतून मार्ग काढून पुढे जाता येते हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील दोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या दिव्यांग महिला सरपंच कविता भोंडवे यांनी आपल्या दहा वर्षांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत दाखवून दिले आहे.
दिंडोरी तालुक्यातील दहेगाव आणि वागळूद या अतिदुर्गम भागातील ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच कविता भोंडवे या स्वतः दोन्ही पायांनी दिव्यांग असून त्यांनी मोठे काम उभे केले आहे. कविता या सन 2011 पासून आज पर्यंत दहेगाव आणि वागळुद गावाच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची सरपंच म्हणून निवड केली मात्र पहिल्यांदा निवड झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील बारकावे राजकारण विविध योजनांचा पाठपुरावा करून निधी कशाप्रकारे मिळवावा विविध कामासंदर्भात शासनाच्या कोणकोणत्या खात्यांशी अधिकार्यांशी संपर्क साधावा याबाबत या अनभिज्ञ होत्या. मात्र तरीही गावाच्या विकासासाठी काहीतरी करायला हवे. याची तळमळ होती गावातील अनेक समस्या त्यांच्यासमोर होत्या म्हणून त्यांनी या संदर्भात विशेष प्रशिक्षण घेतले. स्वतःहून अनेक बाबी अभ्यासल्या आणि सरपंच म्हणून कामांना गती देत गावातील अनेक प्रश्न मार्गी लावले त्यांच्या कार्यकौशल्या मुळे ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ तसेच शासकीय अधिकार्यांकडून न वेळोवेळी सहकार्य मिळत गेल ग्रुप ग्रामपंचायतीतील तळेगाव आणि वाघळुद ही दोन्ही गावे आदिवासी बहुल अतिशय दुर्गम भागात असून गावांमध्ये जाण्यासाठी धड रस्ताही नाही रस्त्या अभावी येथे एसटी बसही नाही गावामध्ये जिल्हा परिषदेची केवळ चौथीपर्यंत शाळा आहे.

गावातील विद्यार्थ्यांना हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करीत दिंडोरी लखमापूर येथे जावे लागते. गावात एकही दवाखाना किंवा आरोग्य केंद्र नाही काही वर्षापूर्वी पर्यंत गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होता मात्र कविता सरपंच झाल्यानंतर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून काही किलोमीटर अंतरावरील ओझरखेड धरणातून थेट पाईपलाईन द्वारे गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावात पाण्याची टाकी बांधून घरोघरी उपलब्ध करून दिले पूर्वी पाण्याअभावी गावात शौचालय असली तरी शौचालयाचा वापर नागरिकांकडून करण्यात येत नव्हता आता मात्र सर्व लहान थोर नागरिक शौचालयांचा वापर करतात केंद्र शासनाच्या योजनेतून नागरिकांना शौचालय बांधणीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले गावांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी कविता यांनी विशेष प्रयत्न केले त्यासाठी त्यावेळी महिलांची भेट घेण्यासाठी स्वतः फिरत असतात दहा बचत गटांच्या माध्यमातून सुमारे शंभर महिला या उपक्रमाची जोडल्या गेल्या आहेत त्यातील अनेक महिलांना शेळीपालन कुकुटपालन यासाठी बँका कडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे करोना काळात या ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे जनजागृती केली या दोन्ही गावांमध्ये स्वच्छते विषयी मार्गदर्शन मास्क वाटप स्यांनीनटायझर वाटप असे उपक्रम ग्रामपंचायती कडून राबविण्यात आले त्यामुळे गावात केवळ दोन करोना पेशंट होते मात्र ते देखील उपचार घेऊन ठणठणीत बरे झाले आहेत करोना मुळे कोणाचाही म्रुत्यू झाला नाही.
ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी कविता भोंडवे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक नागरिकांना या योजनेअंतर्गत घरांचा लाभ झाला आहे गावातील दारू मटका व अन्य अवैध धंदे बंद करण्यासाठी आंदोलन करून गावातील हे धंदे बंद केल्याने गावांत युवक व महिला च्या आयुष्यावर चांगला परिणाम झाला गावा मध्ये उज्वला योजनेअंतर्गत ही अनेक महिलांना करोना काळात मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध झाल्यामुळे गरीब कुटुंबांना त्याचा फायदा झाला आहे.
कविता यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत हद्दीतील गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत गावाला प्राप्त झालेल्या निधीतून ग्रामपंचायतीची इमारत पाण्याच्या टाकीचे बांधकाम शाळेचे बांधकाम स्मशानभूमी मधील सुविधा गावातील रस्त्यांवर आणि लहान चौकात हाय मास्ट दिवे लावण्यात आले आहेत गावांतर्गत रस्त्यावर दिव्यांची चांगलीच सोय झाल्यामुळे रात्रीच्यावेळी ग्रामस्थांना विशेषतः महिलांना अतिशय सुरक्षित वाटत आहे गावातील वस्ती बहुतांश शेतकऱ्यांची असल्यामुळे ते कचऱ्याचे विलगीकरण करून ओला कचरा शेतामध्ये कंपोस्ट खतासाठी वापरतात या ग्रुप ग्रामपंचायतीमधील दहेगाव ची लोकसंख्या सुमारे 1233 असून वाघुळ गावची लोकसंख्या सुमारे 666 एवढी आहे या दोन्ही गावातील समस्या सोडविण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून सरपंच कविता भोंडवे या प्रयत्नशील आहेत त्यांच्या कामगिरीवर ग्रामस्थ समाधानी आहेत गावच्या समस्या सोडविण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून कटिबद्ध असलेल्या कविता यांना गावाच्या आणखीनही काही समस्या सोडविण्यासाठी भविष्यात काम करायचे आहे आहे.
यामुळे मुख्यतः गावापर्यंत मुख्यतः चांगला रस्ता व्हावा यासाठी त्या सध्याय जिल्हा परिषदेकडे बांधकाम खात्याकडे आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करीत आहेत रस्त्या अभावी गावातील मुलींचे शिक्षण थांबत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मिळाले यासाठी त्या प्रयत्नशील आहेत गावांत प्राथमिक आरोग्यकेंद्र अभावी विशेषतः महिलांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते गर्भवती महिला अथवा आजारी व्यक्ती यांना उपचारासाठी खाजगी वाहनातून काही किलोमीटर अंतरावर दिंडोरी येथे न्यावे लागते वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि दुसरीकडे खराब रस्ता यामुळे अनेक वेळा रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे त्यामुळे शासनाने आता गावच्या या दोन महत्त्वाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे दहा वर्षापूर्वी सरपंचपदी विराजमान झालेल्या कविता भोंडवे यांनी अतिशय तळमळीने गावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केला मात्र त्यांच्या दिव्यांग असल्याच्या स्थितीकडे बोट दाखवित काहीजणांनी सुरुवातीच्या काळात त्यांची मानहानी हेटाळणी केली या बद्दल कविता या खंत व्यक्त करतात मात्र आज आपल्या कामाच्या झपाट्याने त्यांनी आपल्या टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत.
Comments are closed.