Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजने अंतर्गत कुक्कुटपालनासाठी तीनशे लाभार्थ्यांना वन विभागाने दिला लाभ

गडचिरोली वन विभागाचा पुढाकार; गुरवळा, हिरापूर, बोथेळा, आंबेटोला संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत लाभार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी भर... तीनशे पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ; पाच हजार कोंबडीच्या पिल्लांचे वाटप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गावातील जल-जंगल-जमीन या संसाधनाचा शास्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्मिती करणे, पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याहेतू गावकऱ्यांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण व व्यवस्थापनाचा दर्जा उंचावण्यासाठी वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या दोन किमी आतील गावामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना सुरु करण्यात आली आहे.

 

गडचिरोली, दि. ३० नोव्हेंबर : राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा मार्फत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन जन-वन विकास साधण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजना सुरु केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावातील संसाधनाची उत्पादकता आणि पर्यायी रोजगार संधी वाढवून वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मानव व वन्यप्राणी संघर्ष कमी करून सहजीवन प्रस्थापित करण्याचा या योजनेचा उद्देश असल्याने पहिल्या टप्प्यात गडचिरोली वन विभागातील येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरुवळा, हिरापूर, बोथेळा, आंबेटोला येथील गावात कुक्कुटपालन करण्यासाठी गरजूवंत लाभार्थ्यांचे नाव नोंदवून २५ टक्के लाभार्थी सहभाग तर  ७५ टक्के वन विभाग या योजनेवर अनुदान दिला असून तीनशेहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

सदर योजनेमध्ये हिरापूर या गावातील १००, गुरवडा ११०, बोथेळा  ४०, आंबेटोला ६० लाभार्थ्यांना  लाभ दिला आहे. या अगोदर कोंबडीच्या पिल्लांना २१ दिवस बृडींग करून मरेक्स, राणीखेत, गंबोरो ह्या रोगांची प्रतिबंधात्मक लसीकरण करून २१ दिवसाचे पाच हजार देशी कोंबडीच्या जवळपास २०० ग्रॅम वजनाच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी व्यवस्था निर्माण करणे, गावकऱ्यांचा सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे, व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे हे या योजनेचा एकमेव उद्देश असल्याने ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत लाभार्थ्यांना नियोजन व आर्थिक प्रगल्भतेवर अधिक जोर दिला आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजनेचा लाभ गरजुवंत लाभार्थ्यांना मिळण्यासाठी डॉ. किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात डॉ. कुमार स्वामी उपवनसंरक्षक गडचिरोली, सोनल भडके सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली, वनविभाग (रोहयो), अरविंद पेंदाम वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली यांच्या नेतृत्वात कुकूटपालन व व्यवस्थापन करण्यासाठी निलेश गेडाम संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरवळा, रमेश जी. मेश्राम अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिती हिरापूर तसेच अरुप कन्नमवार क्षेत्र सहायक गुरवडा, गुरु वाढई वनरक्षक गुरवडा, धमरावं दुर्गमवार, प्रियंका रायपुरे वनरक्षक गुरवडा, विलास भोयर, लंकेश गेडाम, प्रशांत गेडाम, कमलेश निकुरे, के.बी मडावी व सर्व वन कर्मचाऱ्यांचे लाभार्थ्यांना सहकार्य लाभले आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास’ योजना मार्फत गडचिरोली वनविभागातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत असलेल्या गावांमध्ये कुक्कुटपालन पारंपरिक पद्धतीने खुड कोंबडी २१ दिवसात अंडी उबऊन पिलं बाहेर येतात, पहिल्या एक महिन्यात कावळे, मांजर, मुंगूस ह्या पिल्लाची शिकार करू शकतात, लसीकरण केलं नाही तर मोठया प्रमाणात कोंबड्या साथीच्या रोगाने मरू शकतात, ह्या अडचणी टाळून कमीत कमी २१ दिवस बृडींग (brooding) व लसीकरण करून लाभार्थ्यांना पिल्ले दिली असून पुन्हा २ महिने संगोपन केलं तर लाभार्थ्यांना प्रति कोंबडी (पक्षी) रु २००/- पर्यंत लाभ मिळू शकतो.

डॉ किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली

हे देखील वाचा :

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

आश्चर्यकारक! एका महिलेन नवऱ्याला घटस्फोट देत कुत्र्याशी केल लग्न…

खाजगी प्रवासी वाहनधारकांना आले सुगीचे दिवस

इंडियन ऑईल मध्ये ५२७ ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती

 

Comments are closed.