Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कांदळवनामुळे द्रोणागिरी सीआरझेडच्या कचाट्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

उरण, 18 नोव्हेंबर :- सिडकोने सद्या उलवे, द्रोणागिरीतील विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र या नोडमध्ये कांदळवन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून विकासकामांना मर्यादा आहेत.

सिडकोने द्रोणागिरी नोडमधील 50 मीटर बफर झोनमधील विविध 23 विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती. त्यावर सीआरझेड प्राधिकरणाने सिडकोकडून खुलासा मागितला आहे. ही सर्व कामे सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहेत. संपूर्ण नवी मुंबई शहर हे ठाणे खाडीमुळे सीआरझेडच्या परिघात मोडते. यामुळे या शहरात कोणतेही विकासकामे करताना नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका असो वा सिडको महामंडळ अथवा एमएमआरडीए या प्रत्येकाला ही कामे विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाची अर्थात सीआरझेडची मान्यता घ्यावी लागते. अशाच प्रकारे सिडकोने द्रोणागिरी नोडमधील 50 मीटर बफर झोनमधील विविध 23 विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती.या विकासकामांमध्ये तीन कामे सीव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट, पंप हाऊसची आहेत. तर, सेक्टर-51,52 आणि 55,56 मधील होल्डिंग पॉडवरील पूल, 22 मीटरचा नाला बांधणे, आठ नाल्यांची सफाई, आठ सेवा रस्त्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सीआरझेडच्या 160 व्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता प्राधिकरणाने सिडकोकडून ठोस खुलासा व स्पष्टीकरण मागितले आहे. यात प्राधिकरणाने म्हटले आहे, सिडकोने ही कामे आधीच पूर्ण केली आहेत काय. की सिडको नव्याने परवानगी मागत आहे, की कार्योत्तर मंजुरी मागत आहे. सीआरझेड प्राधिकरणाच्या या प्रश्‍नांना उत्तरे आता सिडकोला द्यावी लाणगार आहेत.पावणे दोन लाख चौरस मीटर खारफुटी बाधितसीव्हरेज ट्रिटमेंट प्रकल्पसेक्टर 56 व 59 मध्ये 61698 चौरस मीटर क्षेत्रात 108 एमएलडी क्षमतेचा सीव्हरेज ट्रिटमेंट बांधण्यात येणार असून त्यात खारफुटी जाणार आहे. हा परिसर सीआरझेड 1 ए मध्ये मोडतो. तर सेक्टर 51 ए मध्ये 5915 चौरस मीटर जागेवर पंप हाऊस बांधण्यात येत असून यात ही खारफुटी बाधित होणार.

पावणे दोन लाख चौरस मीटर खारफुटी बाधितसीव्हरेज  ट्रिटमेंट प्रकल्पसेक्टर 56 व 59 मध्ये 61698 चौरस मीटर क्षेत्रात 108 एमएलडी क्षमतेचा सीव्हरेज ट्रिटमेंट बांधण्यात येणार असून त्यात खारफुटी जाणार आहे. हा परिसर सीआरझेड 1 ए मध्ये मोडतो. तर सेक्टर 51 ए मध्ये 5915 चौरस मीटर जागेवर पंप हाऊस बांधण्यात येत असून यात ही खारफुटी बाधित होणार आहे.सेवा रस्त्यांचे बांधकामविविध रस्त्यांसाठी सेक्टर 15 मध्ये 4322 चौरस मीटर, 15 ए मध्ये 7334 चौरस मीटर, सेक्टर 41 मध्ये 2391 चौरस मीटर, चौरस मीटर, सेक्टर 48 मध्ये 5896 चौरस मीटर, सेक्टर 50 मध्ये 2984 चौरस मीटर, सेक्टर 56 मध्ये 15450चौरस मीटर, सेक्टर 15 मधील एसटीपी शेजारी 2869 चौरस मीटर, सेक्टर 27 मध्ये सीआरझेड क्षेत्र बाधीत होत आहे.नाल्यांची स्वच्छतासिडकोने सेक्टर 47 ते 55 मध्ये नाल्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला असून यात मोठ्याप्रमाणात खारफुटी बाधित होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बफर झोन हे क्षेत्र सीआरझेडच्या 50 मीटर बफर झोनमध्ये मोडते. यात सेक्टर 47 मध्ये 10488 चौरस मीटर, सेक्टर 48 मध्ये 4517 चौरस मीटर, सेक्टर 50 मध्ये 8376 चौरस मीटर, सेक्टर 51 मध्ये 12096 चौरस मीटर, सेक्टर 52 मध्ये आणि सेक्टर 53 मध्ये प्रत्येकी 7789 चौरस मीटर तर सेक्टर 54 आणि 55 मध्ये प्रत्येकी 8290 चौरस मीटर असे एक लाख 70 हजार 631 चौरस मीटर खारफुटी क्षेत्र बाधित होत आहे.

हे पण वाचा :-

दोघाआरोपींना नऊ लाखाच्या मुद्देमालसह भिवंडी पोलिसांनी केली अटक

Comments are closed.