लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 1, सप्टेंबर :- एलपीजी गॅस दरात मोठी घट करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. इंडियन ऑईलने १ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किंमतीनुसार सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. मुंबई आता १९३६.५० ऐवजी १८४४ रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत १९७६.५०ऐवजी १८८५ रुपये तर कोलकात्यात २०९५.५० ऐवजी १९९५.५० आणि चेन्नईत २०४१ ऐवजी २०४५ रुपये मोजावे लागतील.
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत सिलेंडरमागे २०० रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त १२ सिलिंडरपर्यंतच मर्यादित असेल. सरकारच्या या निर्णयाचा ९ कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली आहे. १९ मे २०२२ रोजी २३५४ रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचलेल्या गॅस सिलेंडरची किंमत १ जून रोजी २२१९ रुपये होती. महिनाभरानंतर सिलिंडरची किंमत ९८ रुपयांनी कमी होऊन ती २०२१ रुपये झाली. ६ जुलै रोजी तेल कंपन्यांनी या सिलेंडरची किंमत २०१२.५० रुपये केली. १ ऑगस्टपासून हा सिलेंडर १९७६.५० रुपयांना मिळू लागला. आता १ सप्टेंबरला याची किंमत १८८५ झाली. सततच्या घसरणीमुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
हे देखील वाचा :-
धक्कादायक! गडचिरोलीत अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याने संपवले जीवन
सेलिब्रेटींचा बाप्पा या बॉलिवूड स्टार्सच्या घरी गणपती बाप्पांच आगमन
Comments are closed.