Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“नशा मुक्त भारत पंधरवडा”चा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

गडचिरोली जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- प्र. जिल्हाधिकारी धनाजी पाटील

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 13 जून – व्यसनाचे दुष्परिणाम अत्यंत वाईट असतात, त्यामुळे कुणीही व्यसनाच्या आहारी जावु नये. आपला गडचिरोली जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले.सामाजिक न्याय विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित “नशा मुक्त भारत पंधरवडा” अभियानाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले की, निरोगी जीवनासाठी व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या गडचिरोली जिल्हयात “नशा मुक्त भारत पंधरवडा” यशस्वी करण्याकरीता सर्वच अधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून व्यसनमुक्तीसाठी प्रभावीपणे जनजागृती करावी. भावी पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याकरीता विद्यार्थ्यांना आतापासूनच व्यसनाच्या घातक दुष्परिणामांची माहिती द्यावी. व्यसन किती वाईट असते. हे त्यांच्या मनावर बिंबवावे. शिक्षण विभागाने यासाठी पुढाकार घेऊन व्यसनमुक्तीसाठी या पंधरवडयात विविध स्पर्धांचे आयोजन करावे. समाजकल्याण विभागाने व्याख्याने, पोस्टर स्पर्धा आयोजित कराव्यात. आरोग्य विभागाने व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन कार्यशाळा घ्याव्यात. प्रसारमाध्यमानीही व्यसनाविरोधात मोठया प्रमाणात प्रचारप्रसिध्दी करावी. व्यसनमुक्तीच्या या लढयात सर्वांनीच उत्स्फुर्तपण सहभागी व्हावे, असे आवाहनही अप्पर जिल्हाधिकारी यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, सिव्हिल सर्जन  सोलंकी, कणसे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गाडगे पशू संवर्धन उपायुक्त, आरटीओ  मेश्राम, टेंभुर्णे NIC, उपविभागीय पोलिस अधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, आदींसह विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली.

प्रास्ताविकात डॉ.सचिन मडावी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य पदार्थ सेवन विरोधी (२६ जून) दिनाचे औचित्य साधून दि. 12 ते 26 जून 2023 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात “नशा मुक्त भारत अभियाना”अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये महिला मंडळे, युवकमंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनुदानित संस्था, महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, प्राथमिक विद्यालये, अपंग संस्था, आश्रमशाळा, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने जनजागृती मोहिम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रतिज्ञा, पथनाट इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.