नवनिर्वाचित नगर परिषद सभापतींचे खा. अशोक नेते यांनी केले अभिनंदन
गडचिरोली, दि. 11 जानेवारी: गडचिरोली नगर परिषदेची सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया आज नगर परिषदसभागृहात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचित सभापतींचे खासदार अशोक नेते यांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व त्यांच्या आगामी कारकिर्दी साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर स्वच्छता व आरोग्य सभापती, प्रवीण वाघरे बांधकाम सभापती, मुक्तेश्वर काटवे पाणीपुरवठा सभापती, वर्षाताई नैताम शिक्षण सभापती तर प्रशांत खोब्रागडे अर्थ व नियोजन सभापती अशा पाचही नवनिर्वाचित सभापती चे खासदार अशोक नेते यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी आ. डॉ देवरावजी होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पुर्वविदर्भ संपर्क प्रमुख मा. बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष नीलिमा राऊत, महिला आघाडी तालुका अध्यक्ष दुर्गाताई काटवे, शहर अध्यक्ष सविता उरकुडे तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.