Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एका जहाल नक्षलीस कंठस्नान

गडचिरोली पोलीस दलाचे अभूतपूर्व यश

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली अहेरी 30 सप्टेंबर :-  उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­ऱ्या उपपोस्ट राजाराम (खां) हद्दीत मौजे कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे ३० ते ४० नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दिनांक २८/०९/२०२२ रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन मौजे कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक २८/०९/२०२२ रोजीचे सायं. ७ ते ८ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ३० ते ४० नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यारे लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणेसाठी आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

सदर नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळावर ०१ नक्षल मृतदेह मिळुन आले. तसेच मृतदेहासोबत ८ एमएम रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता, सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माहे ऑक्टोबर २०२० रोजी पासून ते आतापर्यंत एकुण ५५ नक्षलवादी विविध चकमकीत ठार झाले असून, ४६ नक्षलवादी अटक व १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  समीर शेख साो. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री.अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

हत्या आणि आत्महत्या प्रकरणातून बोईसर हादरले…

अभ्यासिकेत अभ्यास करत असतानाच विद्यार्थीनींचा आकस्मिक मृत्यु .

 

Comments are closed.