रखरखत्या उन्हात सूरजागड लोहखनिज उत्खनन विरोधात एल्गार
सुरजागड विरोधात अजय कंकडालवार यांच्यासह भाजपचा पाठिंबा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
एटापल्ली, 20 जून – तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खननाविरोधात अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने १९ जून रोजी एटापल्ली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरांतील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन निघालेल्या मोर्चात स्थानिकांसह व्यापारी वर्गाने मोठया संख्येने उपस्थित दर्शविले. आदिवासी विद्यार्थी संघ व अजय कंकाडालवार यांच्या समर्थनातील तसेच भाजप समर्थनाथ असलेल्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
सूरजागड पहाडीवरील उत्खनन व वाहतुकीमुळे स्थानिक आदिवासीं बांधवात सुरजागड कंपनी विरोधात तीव्र नाराजी आहे, लोहवाहतुकीमुळे हजारो ट्रकची वाहतूक होत असल्याने अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने स्थानिकांनाही याची झळ सोसावी लागत आहे.बेदरकार वाहतूक,त्यातून निष्पाप लोकांचे चाललेले जीव, धूळ, प्रदूषण,रस्त्याकाठच्या पिकांची हानी,रस्त्यांची दयनीय अवस्था अश्या अनेक समस्या आहेत. समृद्ध वनातील वृक्षाची राजरोसपणे कत्तल केल्या जात आहे.
याशिवाय लोहखनिज उत्खनन करण्यासाठी सातत्याने स्फोट केल्या जात आहेत. त्यामुळे जलस्त्रोतात घट दिवसान दिवस पाहायला मिळत असून पाणीटंचाईचा फटका बसत असल्याचा स्थानिक नागरिकांत आरोप होत आहे.सूर्जागड लोहप्रकल्प विरोधात एटापल्ली तालुका अन्याय विरोधी संघर्ष समितीने बंदची हाक दिली होती. त्यास व्यापाऱ्यांनी खरगोश प्रतिसाद दिला.
दि,१९ जून रोजी एटापल्ली शहर कडकडीत बंद ठेवून ऍटापल्ली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मोर्चाला प्रारंभ करुन प्रमुख मार्गाने हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी मोर्चेकऱ्यांची दिलेले निवेदन स्वीकारले.या प्रसंगी उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड उपस्थित होते.परिसरातील महिला,पुरुष, व्यापारी, आदिवासी विद्यार्थी संघ व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
सर्जागड लोहप्रकल्पाच्या संदर्भात या आहेत मागण्या –
लोहवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग निर्मिती करावा, तोपर्यंत रस्त्याने वाहतूक बंद ठेवावी, पाण्याची पातळी खालावत गेल्याने जलस्त्रोत वाढवण्यासाठी बंधाऱ्याची निर्मिती करून जलस्त्रोत वाढीस भर द्यावा. सर्वसामान्यांना वेळेवर उपचार होण्यासाठी सर्व सुख सोयी सुविधा उपलब्ध असलेला दवाखाना निर्मिती करावे. उत्खननाच्या मिळणाऱ्या रॉयल्टीतील ७५ टक्के निधी तालुक्याच्यां विकासकामासाठी करण्यात यावे, बसेसची संख्या वाढवून दळणवळण सुखकर करावे,आलापल्ली ते चोखेवाडा रस्त्याचे बांधकाम करावे, प्रकल्पात स्थानिक तरुणांना ८० टक्के रोजगार उपलब्ध करुन द्यावा, जनहितवादी समितीने यापूर्वी केलेल्या ११० दिवसाच्या आंदोलनावेळी लॉयड मेटल्स कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलन दरम्यान दिलेल्या उपविभागीय दंडाधिकारी यांना दिलेल्या विहित मुदतीत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर बेमुदत चक्काजाम पुकारण्यात येईल. त्यामुळे येत्या २० दिवसांत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा बेमुदत चक्काजाम करण्यात येईल,असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
यावेळी उपस्थित आविसं, अजय ककाडालवार अहेरी बाजार समिती सभापती तथा माजी जिल्हा परिषद, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लुरवार,भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष व भाजपचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत,आविसं चे कार्यकर्ते एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टमी,मुन्नीताई दुर्वा, संगीताताई दुर्वा,मट्टमी ताई,सचिव प्रज्वल नागूलवार,गणेश खेडेकर तालुका उपाध्यक्ष भाजपा एटापल्ली,रेखा मोहुर्ले नगरसेविका,निर्मला नल्लावार नगरसेविका,बिरजु तिम्मा नगरसेवक, संपत पैडाकुलवार युवा अध्यक्ष भाजपा, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, भाजप तालुकाध्यक्ष विजय नल्लावार,तालुका उपाध्यक्ष गणेश खेडेकरसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.