Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आई सासूचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पिंपरी चिंचवड, 15 जून – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक कर्मचारी काम करीत होते. मात्र मुलगा व सुनांना नोकरी नसल्याने त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेत लाड-पागे अंतर्गत आपली मुले व सुनांना त्यांच्या जागेवर नोकरी दिली मात्र पालिकेची हक्काची नोकरी मिळाल्यानंतर पोटच्या पोरांनी देखील आई-वडिलांकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे महापालिकेमध्ये 367 कर्मचारी हे लाड-पागे अंतर्गत कामावर रुजू झाले आहेत. म्हणजेच आई वडील यांच्या जागेवर त्यांचा मुलगा किंवा सून वारसनोंदी ने कामावर रुजू झाले आहेत.

आरोग्य विभागांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवृत्त होण्यास काही वर्ष बाकी असताना स्वेच्छा निवृत्ती घेऊन अशा पद्धतीने वारसांना कामाला लावले आहे लाड-पागे अंतर्गत वारसाला नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी ज्यांच्या जागेवर नोकरी मिळवली आहे त्यांचा सांभाळ करणे आवश्यक आहे, मात्र अनेक मुले व सुनांनी नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे त्याबाबत स्वेच्छा निवृत्ती घेतलेलले कर्मचारी सातत्याने तक्रार करीत होते त्यामुळे आता पालिका कडून कर्मचाऱ्यांवर कारवाईस सुरुवात केली असून चार कर्मचाऱ्यांना नोटीस देखील देण्यात आली आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.