Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  
  • मराठी नाटकांसाठी मुंबईतील नाट्यगृहांची सवलत चालूच राहणार.
  • अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह केली विस्तृत चर्चा.

मुंबई, दि. 25 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यातील सर्व 52 नाट्यगृहे सर्व सोयी सुविधांसह सुसज्ज व्हावी यासाठी प्रयत्न करू असे सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत दोन्ही बाजूचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी अशी मनापासून इच्छा असून यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध आहे ; यासंदर्भात एक बैठक लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यधर्मी चे अध्यक्ष प्रशांत दामले यांना दिले व विभागाला तशा सूचना दिल्या.

जागतिक मराठी नाट्यधर्मी या संस्थेच्या वतीने अभिनेते प्रशांत दामले यांनी बुधवारी विधानभवन येथे भेट घेतली. या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर सचिव थोरात, उपसचिव विद्या वाघमारे, पुरातत्त्व विभागाचे संचालक गर्जे हे उपस्थित होेते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या बैठकीत प्रशांत दामले यांनी राज्यातील नाट्य गृहांची स्थिती आणि उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी या अडचणी दूर करुन नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना द्याव्यात असे सांगून यासंदर्भातील तज्ञ व कलावंत यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. नाट्यगृहात सोलर व्यवस्था व्हावी अशी सूचनाही केली.
तज्ञांकडून सूचना आल्या नंतर त्यासंदर्भात गरज भासल्यास सांस्कृतिक विभागाकडून येणाऱ्या अधिवेशनात निश्चितच पुरवणी मागण्यद्वारे निधीची तरतूद देखील केली जाईल असेही आश्वस्थ केले.
या बैठकीस संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्वश्री आ.योगेश केळकर आणि आ.सिद्धार्थ शिरोळे हे देखिल उपस्थित होते.

मराठी नाटकांसाठी नाट्यगृह सवलतीच्या दरात !

कोरोना च्या काळात मराठी नाटक आणि कलावंत यांच्यावर देखील इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक संकट कोसळले. आता कुठे हे क्षेत्र रुळावर येऊ लागले आहे, तरिदेखिल सहकार्य अपेक्षित असून सवलतीच्या दरात मराठी नाटकांना नाटय़गृहे उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी प्रशांत दामले यांनी यावेळी केली. याला तात्काळ प्रतिसाद देत मुंबईतील नाट्यगृहे जून 2023 पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी चर्चा केली आणि श्री चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सवलतीचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले .

हे देखील वाचा : 

“त्या” दोन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

‘महाराष्ट्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर आरटीओ करणार कारवाई

 

Comments are closed.