Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ४ जानेवारी : नक्षलीदृष्टया अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखिल विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व नक्षल कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाने आज दिनांक 4/1/2023 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मन्ने राजाराम या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.

सदर पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, त्यात 1000 मनुष्यबळ , 10 जेसीबी, 10 ट्रेलर, 3 पोकलेन, 40 ट्रक इत्यादीच्या सहायाने अवघ्या एका दिवसात पोस्ट उभारणी करण्यात आली.पोस्टमध्ये वायफाय सुविधा, 20 पोर्टा कॅबिन, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे 3 अधिकारी व 46 अमलदार, एसआरपीफ चे 2 अधिकारी व 50 अमलदार तसेच सीआरपीएफ चे एकअसिस्टंट कमांडंट,4 अधिकारी व 60 अमलदार तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्ट उभारणी कार्यक्रमात जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला त्यात मंने राजाराम येथील नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर पोस्ट उभारणी कार्यक्रमात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, सीआरपीएफ चे पोलिस उपमहानिरीक्षक लोकेंद्र सिंह,पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल., सीआरपीएफ 9th बटालियन चे कमांडंट बाळापूरकर, अपर पोलिस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक(अहेरी ) यतीश देशमुख., अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड नितीन गणापुरे व मन्नेराजाराम चे नवनियुक्त प्रभारी उमेश कदम उपस्थीत होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.