माजी ग्रा. पं. सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
- ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडावर असतांना आविसचे तिरुपती मडावी यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
- आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून केले स्वागत
- इंदाराम येथे आविसचा त्याग केल्याने राजकीय चर्चेला मोठे उधाण
अहेरी, दि. २६ डिसेंबर:- तालुक्यात येत असलेल्या इंदाराम येथील आविसचे युवा कार्यकर्ते व माजी ग्राम पंचायत सदस्य तिरुपती मडावी यांनी आज दि. 26 डिसेंबर रोजी आविसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला.
यावेळी आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी तिरुपती मडावी यांना पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत करून पुढील पक्षाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतांना पक्षाचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, रा.काँ. चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, युवा कार्यकर्ते सीताराम आत्राम, शैलेश गेडाम आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते. ग्राम पंचायत निवडणुका तोंडावर असतांना आविसचे माजी ग्राम पंचायत सदस्य तिरुपती मडावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने इंदाराम येथे राजकीय चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
Comments are closed.