स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर: जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातुन महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्याची अंतिम मुदतीस आता दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुर्वी ही मुदत दिनांक 15 डिसेंबर पर्यंत होती.
याप्रकल्पातुन सर्व-समावेशक आणि स्पर्धाक्षम मुल्यसाखळ्या विकसित करावयाचे उदिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारीत संस्थांनी मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. यास चांगला प्रतिसाद मिळालेला असून आता पर्यंत सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत.

तरी शेतकऱ्यांची आणि खरेदीदार संस्थांची मागणी लक्षात घेवून अर्ज करण्यास दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.smart-mh.org या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
Comments are closed.