Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती मध्ये बनावट कोरोना विमा रॅकेट सक्रिय; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह करून देणे सर्रास सुरू?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. २५ फेब्रुवारी: एकीकडे अमरावती मध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णवाढि मध्ये अमरावतीचा डंका सम्पूर्ण भारतातच वाजत असल्याच विविध अहवालातुन समोर येत आहे. याच अनुषंगाने अमरावती मध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने का वाढत आहे? याबाबतचा नवा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह आलेला कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह करून देणारं मोठं  बनावट कोरोना विमा रॅकेट आहे. असा दावा खुद्द जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीदरम्यान केला आहे. अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी येथील टेस्टिंग लॅब मध्ये सदर प्रकार सूर असल्याचं आणि या बद्दल स्वतःच त्यांना अनुभव आला असल्याचा प्रकाश साबळे यांनी सांगितलं आहे. खासगी दवाखान्यामध्ये कोरोनाची टेस्ट करून सदर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून त्या बदल्यात 15 दिवस सुट्टी आणि लाखोंचा विमा लाटण्याचा प्रकार देखील सुरू आहे. असाच प्रकार जि प च्या एका सभापत्या समोर घडला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये महानगर पालिकेच्या तब्बल 50 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह करून देण्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार जि.प. च्या सर्वसाधारण बैठकीसमोर प्रकाश साबळे यांनी मांडल्यानंतर जिल्हा परिषदेने याबाबत सखोल  चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिले आहे.

या सर्व प्रकाराची चौकशी सुरू आहे आम्ही सध्या रैपिड टेस्ट बंद केली असुना यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करून अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निकम यांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.