Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, १४, ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार खरीप पणन हंगाम 2022-23 साठी दिनांक 24 सप्टेंबर 2022 ते दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 पर्यंत धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असुन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक,उपप्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी) मार्फत महामंडळाचे एटापल्ली येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.

तरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.एटापल्ली,उडेरा,गेदा चे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एटापल्ली येथे महामंडळाचे खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख अमोल इंगळे,यांच्याशी संपर्क साधुन खरीप पणन हंगाम 2022-23 करीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये धान विक्री साठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच्या आदिवासी विकास कार्यालय सह.संस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधुन दिनांक 24 सप्टेंबर ते दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे करीता सातबारा,आधारकार्ड,नमुना 8अ,बँक पासबुक व इतर आवश्यक दस्तावेज घेऊन स्वत: हजर राहुन ऑनलाईन नोंदणी करुन शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा,असे उप प्रादेशिक व्यवस्थापक अहेरी (उच्च श्रेणी) बी.एस.बरकमकर यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा संपन्न.

Comments are closed.