गडचिरोलीतील अतिदुर्गम भागातील शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना
आतापर्यंत पंधरा कृषी सहलीतून 693 शेतकयांनी घेतला कृषी दर्शन सहलीचा लाभ
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 05 सप्टेंबर – गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्राबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणाया शेतकयांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील शेतकयांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतून गडचिरोली येथून एकुण 45 शेतकयांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण अंतर्गत” सोळाव्या कृषीदर्शन व अभ्यास दौयाचे आयोजन करण्यात आले आहे.