Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.१७ ऑगस्ट : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सन-२०२२-२३ अंतर्गत वैयक्तिक शेततळे राबविण्याबत जिल्ह्यातील ८२% शेती कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. विविध भागात पावसाचे होणारे अस्मान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड या प्रमुख अडचणी आहेत.

अश्या कालवधीत सिंचन सुविधे अभावी पिकाच्या उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खुप जास्त ताण पडल्यास पिके देखील नष्ट होतात पर्यायाने शेतकऱ्यास आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर शेतावर शेततळ्यांसारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

योजनेचे निकष :

१) मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रु.७५ हजार रकमेच्या मर्यादेत अनुदेय असलेल्या अनुदानाचा तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ठ-अ मध्ये नमूद करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

२) या योजनेंतर्गत शेततळे या घटकाची महा – डीबीटी प्रणालीद्वारे. online सोडतीद्वारे लाभार्थ्याची निवड करून शेततळे झाल्या नंतर अनुदेय असलेले अनुदान हे संबंधित शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाशी सलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे वर्ग करणेत येईल.

३) सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.२१६/२०२२/व्यय -१ दि. २९ जुन २०२२ अन्वये मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमितकरण्यात आलेले आहे.

४) सदर योजनेत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची अंतिम तारीख- १८/०८/२०२२ ते १९/०९/२०२२ पर्यंत आहे. अधिक माहिती साठी कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावा असे . जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ब. भि. मास्तोळी यांनी आवाहन केलेले आहे.

हे देखील वाचा

शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सोहळा 2022..

गडचिरोली वनक्षेत्रात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन !

 

 

Comments are closed.