Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

..अखेर ठरलं ! सरपंच/उपसरपंच पदाची निवडणूक होणार 15 फेब्रुवारी ला,अहेरी तालुक्यात राजकीय घडामोडींना आला वेग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 

अहेरी दि ०९ फेब्रुवारी :- अहेरी तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 20 जानेवारीला पार पडल्या होत्या आणि  मतमोजणी 22 जानेवारीला झाली होती.दि . 8 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. आज सरपंच/उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी जाहीर केला आहे.


अहेरी तालुक्यातील सरपंच/उपसरपंच पदाची निवडणूक 15 फेब्रुवारी ला होणार आहे.
या ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 29 अध्यासी अधिकाऱ्यांची व 4 राखीव अधिकाऱ्याची नियुक्ती अहेरी येथील तहसीलदारांनी केली आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


त्या त्या ग्रामपंचायती मध्ये ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार आहे.


राजकीय घडामोडी च्या दृष्टीने अहेरी तालुका हा नेहमीच जिल्ह्याच्या केंद्रबिंदू राहिलेला असल्याने या तालुक्यात कोणता पक्ष जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपले सरपंच विराजमान करनार व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूककित वर्चस्व राखनार याकडे सर्वांचे  लक्ष लागलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.