Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर “त्या” वरिष्ठ लिपिक वासनिक यांचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले विलास शंकर वासनिक (वय ५७, रा. मुरखळा) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी९:१५ वा. शहरातील जिल्हा सत्र न्यायालय चौकात दुचाकीवरून कार्यालयात जात असताना एका हायवा ट्रकने (MH-34 M-8970) जोरदार धडक दिली. अपघातात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

घटनेनंतरची शर्थ वासनिकांना यांना वाचवण्याची…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघाताची माहिती मिळताच पोलीसानी तत्काळ वासनिक यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी तातडीने नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. याची तत्काळ दखल घेत प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पोलीस विभागाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरद्वारे नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात त्यांना पाठवले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वासनिक यांना जीवनदान मिळविण्यास आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाच्या सर्व शर्थीनंतरही, वासनिक यांचे प्राण वाचवता आले नाहीत. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वासनिक यांचा मुलगा बाबासाहेब वासनिक, पोलीस दलात पोलीस शिपाई असून सध्या कोठी पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे, लोकस्पर्श न्यूजला घटनेची माहिती विचारली असता या वृत्तास दुजोरा दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दोन दिवसांत दोन अपघात – पोलिस विभागावर दुहेरी आघात.

गडचिरोली पोलीस विभागाने कालच एका लिपिकाला हृदयविकाराच्या झटक्याने गमावले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी वासनिक यांच्या अपघाती मृत्यूने विभागावर दुहेरी संकट ओढवले आहे. कार्यालयात आणि त्यांच्या मूळगावी मुरखळा येथे शोककळा पसरली आहे.तर कर्मचारी अंत्यत्त भावूक झाले आहेत. “हे दोन दिवस आम्हाला कधीही विसरता येणार नाहीत,” असे भावनिक उद्गार व्यक्त केले जात आहेत.

वासनिक – कर्तव्यनिष्ठ, मनमिळाऊ म्हणून ओळख..

वासनिक हे त्यांच्या मनमिळाऊ आणि नम्र स्वभावासाठी ओळखले जात होते. कोणत्याही विभागीय कार्यक्रमात ते आवर्जून सहभागी होत आणि सर्वांसोबत स्नेहाने वागत. त्यांच्या निधनाने विभागाने एक अनुभवी आणि कार्यतत्पर कर्मचारी गमावला आहे, तर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातही सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे..

अपघातांचा वाढता धोका आणि दुर्लक्षित चौक

जिल्हा सत्र न्यायालय चौक, जेथे हा अपघात झाला, तो गडचिरोलीतील एक अतिशय गजबजलेला आणि वाहतुकीसाठी धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. येथे ना ट्राफिक सिग्नल, ना गतिरोधक, ना वाहतूक नियंत्रण असल्यामुळे दर काही दिवसांनी अपघात होत असतात. आतातरी स्थानिक प्रशासनाने ठोस पावले उचलावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, त्यामुळेच ही बाब घटने नंतर पुनश्च चर्चेत आली आहे.

प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची गरज

या अपघातामुळे निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेमुळे आता नागरिक कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीस अधिक तीव्रता देत आहेत. प्रशासकीय दुर्लक्षामुळे घडलेली जीवितहानी ही केवळ अपघात नसून एक सामाजिक शोकांतिका ठरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे..

Comments are closed.