ऑटोद्वारे अवैध सागवान पाट्या घेऊन जाताना ऑटोसह पाच आरोपींना अटक,वनपरिक्षेत्र कोंनसरी येथील घटना..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली दि. २६/१०/२०२०:
वन विकास महामंडळ यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोंनसरी वनपरिक्षेत्रात वनविकास महामंडळाचे कर्मचारी 24 ऑक्टोबर च्या रात्री गस्त घालत असताना अचानक सकाळच्या सुमारास MH-33 1164 ऑप्पे कंपनीच्या ऑटोद्वारे तीन सागवान दरवाजे अवैधरित्या घेऊन जात असल्याचे लक्षात आले. लगेच वन कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे कुठलेही सागवानाचे कागदपत्रं नसल्याचे संशय बळावला त्यामुळे अधिक तपास केले असता सागवानाचे तीन दरवाजे अवैधरित्या घेऊन जात असल्याचे स्पष्ट होताच ऑटोसह आरोपी नरेश वासुदेव मडावी, देवराव वारले मडावी, कल्पेश मारोती मडावी, यशवंत दयाळ मुरमाडी हे चार मुधोली रिट येथील असून दिवाकर रामदास भोयर जैरामपूर येथील असून या पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या चौकशीत सागवनाचे 0.4199 घनमीटर लाकुड़ असल्याने आरोपीवर वन गुन्हा नोंद करून आज दिवाणी न्यायालय चामोर्शी येथे हजर करण्यात आले.. त्यामुळे अवैधरित्या सागवानाची तस्करी करणार्यांचे धाबे दणानले आहे..
या प्रकरणाची अधिक तपास वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. वी. कुरेशी, यांच्या नेतृत्वात बी. बी. भोसले, एस एम कोंडेवाड (वनपाल)एन, जे मडावी, जी बी तडस, एन के धोंगडे, ए के खिस्ते, (वनरक्षक) इतर वनमजूर यांच्यामार्फ़त कारवाई करण्यात आली..
Comments are closed.