Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाच वर्षीय वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने उडाली खळबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २७ नोव्हेंबर : चंद्रपूर वनवृत्तात  येत असलेल्या बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बीटातील कक्ष क्रमांक ५०० मध्ये वाघिणीचा शव आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मृत वाघीण ही ४ ते ५ वर्षाची असावी असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  वर्तविला असून तिचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाले असल्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पशुधन विकास अधिकारी डॉ. विलास ताजने आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार  यांच्या देखरेखेखाली शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत झालेल्या वाघिणीचे सर्व अवयव सुरक्षित असून मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी व्हिसेरा नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून मध्यवर्ती रोपवाटिका कारवा येथे शवविच्छेदनानंतर अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे प्रतिनिधी तथा इको-प्रो संस्था चे अध्यक्ष बंडू धोतरे, प्रधान वनसंरक्षकांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर आदी उपस्थित होते.  वन विभाग  मृत्त वाघीनी बाबत अधिक तपास करीत आहेत.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

जैवविविधतेत संपन्न असलेल्या …या जिल्ह्यात सापडला अति दुर्मीळ पोवळा साप 

 

 

 

 

 

 

Comments are closed.