Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आ. दीपकदादा आत्राम यांची प्रशासनाला निवेदन देवून वेधले लक्ष .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, 11,ऑक्टोबर :-  अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. दीपकदादा आत्राम यांना सन २०१७- २०१८ या वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत टॉवर (पोल ) बसविण्यात आले होते. त्याचा मोबदला व पिक नुकसान भरपाई अद्याप ही देण्यात आले नसल्याबाबत शान्तिग्राम, तुमरगुंडा, कोलपल्ली हद्दीतील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार सन – २०१७- २०१८ या वर्षामध्ये शेतकऱ्यांनाच्या शेतात विद्युत टॉवर (पोल ) बसविण्यात आले. आणि त्या वर्षाच्या पिक नुकसान भरपाई देण्यात आली . आणि २०१९ ते २०२२ पर्यंतच्या पिक नुकसान व टॉवर लावलेल्या जमिनीच्या मोबदला अजूनही देण्यात आलेला नाही. त्याबाबत शेतकऱ्यांनी माजी आ. दिपकदादा आत्राम यांना प्रत्यक्ष भेटीत निवेदन देवून लक्ष वेधले. यावेळी आपली व्यथा मांडतांना शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की , आम्हा शेतकऱ्यांवर जो अन्याय होत आहे, त्याबाबत चौकशी करण्यात यावी व आम्हा शेतकऱ्यांना मोबदला मिळून देण्यासाठी प्रयत्न करावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शांतिग्राम गावातील ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांची नावे अशी आहेत..

रबिन प्रेमानंद बाला, खितीश खगेंद्र बिस्वास, नारायान नकुल मित्री ,सिद्धेश्वर बिस्वास,जीवन रॉय, नारायण नाथ, रवी बिस्वास गाव- तुमरगुंडा, नामदेव शिवराम कुसनाके, नंदाबाई विस्तारी सेडमाके गाव-कोलपल्ली, विलास सोमा चौधरी, नकटू पोच्या चौधरी, अमसा संन्याशी चौधरी,शंभाजी बुधा कुसनाके, अमसा सोमा चौधरी, हनमंतू विस्तारी चौधरी, या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आश्वासन दिले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,शांतिग्राम उपसरपंच श्रीकांत सम्मतदार,संदीप बडगे,कमल बाला, खितिष विश्वास,पुलिंग गाईन,यशवंत तलांडे,कालिदास चौधरी,नामदेव कुसनाके,सुभाष कुसनाके,यशवंत चौधरी हे उपस्थित होते. दरम्यान 132KV चे कार्यकारी अभियंता,चंद्रपूर इंगळे साहेब याच्या सोबत चर्चा केल्यावर येत्या आठवडा भरात नुकसान भरपाई देणार असे इंगळे साहेबांनी आश्वासन दिले आहे.

हे देखील वाचा :-

निष्ठावतांच्या आगीची मशाल हाती …

गानली समाजाच्या एकजुटी मुळेच खंडोबा मंदीराचे निर्माण- अजय कंकडालवार

Comments are closed.