Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईच्या एकासह चार ड्रग्स तस्करांना अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. २६ नोव्हेंबर : नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मुंबईतील एजंटासह ड्रग्स तस्करांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक वस्तीवर असतांना दिवाळीच्या पाडव्याला नागपूर- कामठी रोडवरील भारत पेट्रोलपंपाच्या जवळ तीन ड्रग्स तस्कर एमडी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, या पथकाने दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून आरोपी मोहम्मद इश्तियाक मोहम्मद अशपाक अंसारी (२७) रा. हसनबाग, नंदनवन, सोहेल पटेल मजहर पटेल (२२), रा. टेकानाका, नागपूर, मोहम्मद कफीक मोहम्मद अयुब (२४), रा. चांदणी चौक, हसनबाग, नागपूर आणि मोहम्मद दानिश खालीद अंसारी (२६), रा. नायगाव नगर, पाडा, मुंबई याला अटक केली.
पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ३७ हजार ३२० रुपयांचे ३४ ग्रॅम ३३ मिली एमडी पावडर, २० हजारांचे ४ मोबाईल, १ लाख ८५ हजारांच्या तीन दुचाकी असा एकूण ३ लाख ४२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

Comments are closed.