मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला 3 सिलिंडरचे पूनर्भरण मोफत
पहिल्या टप्प्यात 15 ऑगस्टपर्यंत गॅस सिलींडर भरणा करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 02 ऑगस्ट- मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पूनर्भरण मोफत उपलब्ध करू देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांची गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे व त्यामुळे सर्व गॅस लाभार्थी यांनी गॅसची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
त्याअनुसार एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ 14.02 कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय राहील. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने अंतर्गत द्यावयाच्या 3 गॅस सिलिंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल. या योजनेंतर्गत 3 सिलिंडरसाठी लाभार्थ्याकडून संपूर्ण रक्कम घेतल्या नंतर राज्य शासनाकडून घ्यावयाची संपूर्ण रक्कम, म्हणजे अंदाजे 830 रुपये प्रति सिलेंडर, इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer (DTB)) द्वारे जमा करण्यात येईल.
या शासन निर्णयानुप्रमाणे 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच दिनांक 1 जुलै 2024 रोजीनंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. पहिल्या टप्यामध्ये प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना मधील लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे सर्व प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना लाभार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2024 पर्यत गॅस सिलेंडर भरणा (Refill) करावी. तसेच शासन निर्देशान्वये पैसे भरून गॅस सिलेंडर घेणे आवश्यक आहे. त्यांनतर त्यांचे पैसे आपल्या बॅक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी गॅस जोडणी सोबत ई-केवायसी असणे तसेच बॅक पासबुक चे व्यवहार असणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.
Comments are closed.