मंडळ अधिकारी,आणि तलाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात..
अहेरी तालुक्तीयातील खमंनचेरू घटना आहे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 02 ऑगस्ट – १ ऑगस्ट राज्यात महसूल दिन म्हणून साजरा करतात, आणि सोबत कार्यक्रम घेवून जनजागृती करतात. माञ अहेरी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी, तलाठी महसुल दिनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या फेरफार करण्यासाठी नऊ हजार रुपयाची मागणी करून तडजोडीनंतर सहा हजार रुपये लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानी रंगेहाथ अटक केल्याने महसूल विभागात खडबळ माजली आहे.
व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (४०) तलाठी तर भुषण रामभाउ जवंजाळकर (३८) मंडळ अधिकारी असे आरोपीचे नाव असून अहेरी तालुक्यात असलेल्या तलाठी महागाव साजा क्र. १० चे खमंनचेरू येथील मंडळ अधिकारी यांचेवर अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई केली आहे.
सदर घटनेत आरोपी ९०००/- रुपये लाचेची मागणी करून केली तडजोडीअंती ६०००/-रू लाच स्विकारतांना रंगेहात अटक करून त्यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकटेश सांबय्या जल्लेवार वय ४० वर्ष वर्ग-३ तलाठी साजा क्र १० महागाव यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायद्या करीता वाम व भ्रष्ट मार्गाने तक्रारदारास तिन हिस्सेदारांचे शेतजमीन फेरफार करून सात-बारावर नाव चढविण्या करीता प्रत्येकी ३०००/-रू प्रमाणे एकुण ९०००/-रू लाच रक्कमेची पंच साक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.
पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले, ला.प्र.वि. गडचिरोली व लाप्रवि. टिम नी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांस तिन हिस्सेदारांचे शेतजमीन फेरफार करून सात-बारावर नाव चढविण्या करीता प्रत्येकी ३०००/-रू प्रमाणे एकुण ९०००/-रू लाच रक्कमेची पंच साक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी करून तडजोडीअंती ६०००/-रू लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पोस्टे. अहेरी जिल्हा-गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी व्यंकटेश सांबय्या जल्लेवार, तलाठी वय-४० वर्ष, तलाठी साजा क्र. १० महागांव व भुषण रामभाउ जवंजाळकर वय ३८ वर्ष, मंडळ अधिकारी खमनचेरू, ता.अहेरी जि. गडचिरोली यांचे घराची घर झडती घेण्यात आली. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले, पो.नि. शिवाजी राठोड, सफौ-सुनिल पेद्दीवार, पोहवा-शंकर डांगे, पोहवा-किशोर जौंजारकर, पो.अं. प्रविण जुमनाके, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
Comments are closed.