चंद्रपूर जिल्ह्यातील दोन रुग्णांच्या मृत्यूंसह आज गडचिरोली जिल्ह्यात 83 नवीन कोरोना बाधित, तर 117 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. ०६ नोव्हें. : चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या २ रुग्णांच्या मृत्यूसह गडचिरोली जिल्हयात 83 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 117 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6407 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5461 वर पोहचली. तसेच सद्या 882 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 64 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. मृत्यूमध्ये दोन्ही व्यक्ति ही चंद्रपूर जिल्हृयातील रहिवाशी असून पहिली व्यक्ति ही 78 वर्षीय पुरुष असून हायपरटेंशनने ग्रस्त होते तसेच दुसरी व्यक्ति 56 वर्षीय पुरुष आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.23 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 13.77 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.
नवीन 83 बाधितांमध्ये गडचिरोली 48, अहेरी 12, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 10, धानोरा 2, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 1 व सिरोंचा येथील 4 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 117 रूग्णांमध्ये गडचिरोली 45, अहेरी 10, आरमोरी 7, भामरागड 9, चामोर्शी 07, धानोरा 0, एटापल्ली 14, मुलचेरा 11, सिरोंचा 1, कोरची 6 व कुरखेडा 4, व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील शिवाजी नगर कॅम्प एरिया 1, साई नगर 3, सर्वोदय वार्ड 4, गणेश नगर 5, वार्ड नं.2 चंडेश्वरी मंदिराजवळ 1, नवेगाव कॉम्पलेक्स 1, कॅम्प एरिया 2, बालाजी नगर चामोर्शी रोड 1, पोलीस कॉलनी 1, स्थानिक 2, बसेरा कॉलनी 1, मुरखडा 1, इंदिरानगर 1,रामनगर 3, कोटगल 1, महाडवाडी 1, मेडिकल कॉलनी 1, कनेरी 1, शांती निवास 1, कॉम्पलेक्स 1, टी पाँईट चौक 2, सुर्याडोंगरी पोटेगाव 1, महिला महाविद्यालयाजवळ 1, राखी गुरवाडा 1, चामोर्शी रोड 4, रेव्हेन्यु कॉलनी 1, गोकुलनगर 2, शिवाजी नगर 1, आरमोरी रोड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 11, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये डुडापल्ली 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितातध्ये आंबेडकर वार्ड 1, पीएस आष्टी 1, अंखोडा 3, वाघोली 1, मातंग मोहल्ला 1, पीएचसी आमगांव 2, फराडा 1, स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये हालेवाला (पोलीस) 1, स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, रामनगर 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, पोलीस स्टेशन 1, पीएचयु पेंटीपका 1 यांचा समावेश आहे.
Comments are closed.