गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्युसह 50 नवीन कोरोना बाधित तर 42 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 : आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8470 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7954 वर पोहचली. तसेच सद्या 425 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 91 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आजच्या नवीन एका मृत्यूमध्ये सिरोंचा तालुक्यातील 85 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.91 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.02 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.
नवीन 50 बाधितांमध्ये गडचिरोली 21, अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 06, धानोरा 05, एटापल्ली 4, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 01, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 42 रूग्णांमध्ये गडचिरोली 14, अहेरी 5, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 8, धानोरा 2, एटापल्ली 2, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 1, कुरखेडा 2 व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील झांसीराणी चौक 04, नवेगाव 03, पोटेगाव रोड 01, रामनगर01, कोर्टा जवळ नवेगाव 01, विहानी शाळेजवळ 01, गोकूल नगर 02, स्थानिक 01, नवेगाव कॉम्पलेक्स 01, पोटेगाव 02, सलाईटोला 01, सर्वोदय वार्ड 01, इदिरानगर 01, कॉम्प ऐरिया 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सावरकर चौक 01, आलापल्ली 02, वांगेपल्ली 01,चारपल्ली व्यंकठपेठ 01, सीआरपीएफ 01, रेनपल्ली 01, इंदाराम 01, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये भगतसिंग वार्ड 01, वैरागड 3, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 01, विक्रमपूर 01, गिलगाव 01, स्थानिक 02, कढोली 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सावरगाव 01, येरकड 01, सांखरा 01,मिचगाव 01, कारवाफा 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये पेठा 01, वांगेपल्ली 01, स्थानिक 01,कोटाकान्डा 01, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये लगाम 01,, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.
Comments are closed.