गडचिरोली जिल्ह्यात आज 74 कोरोनामुक्त तर 42 नवीन कोरोना बाधित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली,दि.02 डिसेंबर: आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तर आज 74 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8041 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7448 वर पोहचली. तसेच सद्या 510 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 83 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.63 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.34 टक्के तर मृत्यू दर 1.03 टक्के झाला.
नवीन 42 बाधितांमध्ये गडचिरोली 15, अहेरी 5, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 8, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 74 रूग्णांमध्ये गडचिरोली 37, अहेरी 4, आरमोरी 18, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 1, एटापल्ली 5, मुलचेरा 2, सिरोंचा 0, कोरची 1, कुरखेडा 3, व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील इंदिरा नगर 1, रामनगर 1, आंबेडकर वार्ड 1, नवेगाव 3, इंदाळा 1, साई नगर 1, सीआरपीएफ 2, कलेक्टर कॉलनी 1, कारगीर चौक 1, पोलीस कॉलनी 1, विसापूर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, आलापल्ली 1, नागेपल्ली 1, महागाव 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये देलोडा 1, स्थानिक 2, देऊलगाव 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये बहादुरपुर 1, भाडभीडी 1, जयनगर 1, स्थानिक 2, आष्टी 2, इल्लूर पेपरमिल 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये शासकीय आश्रम शाळा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, आष्टी 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कडोली 1, धानेगाव 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड 2, भगतसिंग वार्ड 1, ,गीरोला 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.
Comments are closed.