गडचिरोली जिल्हयात आज 17 नवीन कोरोना बाधित तर 31 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 27 डिसेंबर:- आज जिल्हयात 17 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 31 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8930 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8636 वर पोहचली. तसेच सद्या 193 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 101 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.16 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.
नवीन 17 बाधितांमध्ये गडचिरोली 6, अहेरी 8, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 31 रूग्णांमध्ये गडचिरोली 10, अहेरी 2, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 4, धानोरा 2, एटापल्ली 6, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 1, कुरखेडा 1 व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील स्थानिक 2, नवेगाव 1, आरमोरी रोड 1, सुभाषनगर 1, एसटी डेपो 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 4, रिपनपल्ली 1, स्थानिक 1, सुभाष नगर आलापल्ली 1, थोटेबोडी 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कुरुड 1, कोंढाला 1, गांधी वार्ड 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.
Comments are closed.