Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आज गडचिरोली जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित आणि 93 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १२ नोव्हें :- गडचिरोली जिल्हयात 38 नवीन बाधित आढळून आले. तर आज 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6733 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6024 वर पोहचली. तसेच सद्या 642 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 67 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोनाची संख्या कमी होताना दिसत आहे. तरी पण जिल्हा प्रशासन लोकांना जमाव बंदी पासुन दूर राहण्याचा आग्र्ह करत आहे.

आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.54 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.नवीन 38 बाधितांमध्ये गडचिरोली 17, अहेरी 3, आरमोरी 6, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 2, सिरोंचा 0 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 93 रूग्णांमध्ये गडचिरोली 28, अहेरी 18, आरमोरी 3, भामरागड 9, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 2, मुलचेरा 4, सिरोंचा 2 कोरची 4, कुरखेडा 5, व वडसा मधील 8 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर 4, स्नेहानगर 3, हनुमान वार्ड 1, हिरापुर 1, अडपल्ली 1, रेड्डी गोडाऊन 1, आशिर्वाद नगर 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया 1, पोर्ला 1, फुले वार्ड 1, कन्नमवार नगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4, वडधा 1, डोंगरगाव 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये धोडराज 2, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 1, स्थानिक 1, क्रिष्णनगर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये आरएच 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये खुदीरामपल्ली 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शंकरपुर 2 असा समावेश आहे.

Comments are closed.