Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने केले नष्ट…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली :- माओवाद्यांनी शासनविरोधी घातपाताच्या करण्याच्या उद्दिष्टाने शस्त्र व स्फोटक पेरले असल्याचा गोपनीय अहवाल पोलिसांना मिळताच माओवाद्यांचां नक्षल सप्ताहात गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा करण्याचा मोठा बेत उधळून लावला आहे.

आज 15 मार्च 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे कवंडे येथे तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांना अभियानादरम्यान पोलीस स्टेशन कवंडे पासून दक्षिणेला अंदाजे 100 मीटर अंतरावर असलेल्या पायवाटेवर झुडपांमध्ये लपवून ठेवलेली भरमार बंदूक मिळून आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर बाबत वरिष्ठांना माहिती दिली असता, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएस पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणांद्वारे सदर जंगल परिसरात शोध अभियान सुरु करण्यात आले होते.

यावेळी भरमार बंदूक लपविलेल्या झुडपांशेजारी एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, जमिनीमध्ये अंदाजे दिड ते दोन फुट खोलावर डेटोनेटरसाठी वापरण्यात येणा­या लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टीकची पिशवी मिळून आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मिळून आलेल्या पिशवीची बिडीडीएस पथकाकडून एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठंाच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक करित सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.