गडचिरोली पोलीस दलामार्फतमा ओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या एकुण 18 शहीद जवानांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत निधी सुपूर्द.
जैन जागृती केंद्र सेंट्रल बोर्ड, चॅरीटेबल ट्रस्ट, मंुबई यांच्या सहकार्याने शहीद सन्मान सोहळा संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत, गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमांद्वारे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहीद जवानांच्या बलिदानाची जाण ठेवून त्यांच्या कुटंुबियांना व पाल्यांना अनेक प्रकारे मदत पुरविली जात असते. आज दिनांक 12/01/2025 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत जैन जागृती केंद्र, सेंट्रल बोर्ड, चॅरीटेबल ट्रस्ट, मंुबई यांच्या सहकार्याने मौजा जांभुळखेडा भुसुरुंग स्फोट, पोयारकोटी-कोपर्शी चकमक व कोठी येथील माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटंुबियांना व त्यांच्या पाल्यांना मदत स्वरुपात सन्मान निधीचे वाटप करण्यात आले.
यामध्ये 01 मे 2019 रोजी झालेल्या जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटात शहीद 15 जवान, दिनांक 17 मे 2020 रोजी झालेल्या पोयारकोटी-कोपर्शी चकमकीत शहीद 02 जवान व दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या मौजा कोठी येथील माओवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद 01 जवान अशा एकुण 18 जवानांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 1,00,000/- रुपयांच्या धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे गडचिरोली पोलीस दलास येथे पारंपरिक पोलीसींग सोबतच माओवादविरोधी अभियान व नागरी कृती उपक्रम या दोन्ही आयामांवर कार्य करावे लागत असते. माओवादी चळवळीला अटकाव करण्याकरीता, माओवादापासुन आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असताना आतापर्यंत केंद्र व राज्य सुरक्षा दल व गडचिरोली पोलीस दलाच्या एकुण 212 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद जवानांच्या कुटंुबियांसोबत संवाद साधताना सांगितले की, गडचिरोली पोलीस दल शहीद जवानांच्या कुटंुबियांच्या सदैव पाठिशी असून, त्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
Comments are closed.