Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंध्रप्रदेशातील मोबाईल चोर टोळी जेरबंद

काळाचौकी पोलिसांची लक्षवेधी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 16 सप्टेंबर :-  गणेशोत्सव काळात भाविकांची मुंबईतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी वाढते. या गर्दीचा फायदा बाहेरच्या प्रदेशातील चोरटे घेतात. अशाच गर्दीचा फायदा आंध्र प्रदेशातील चोरट्यांनी घेतल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील लालबागच्या गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी , रंगारी बदक चाळ आदी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात भाविकांनी मोठी गर्दी दरवर्षीप्रमाणे केली होती. त्यावेळी गर्दीत अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याचे आढळले. त्याच दरम्यान मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात झारखंडच्या दोन तरुणांना पकडले होते.

गणेशोत्सव काळात लालबागमध्ये येवून मोबाईल चोरून पळालेली एक टोळी पुण्यात असल्याची खबर काळाचौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुण्यात जाऊन सापळा रचत आगुरंमा गिडीअण्णा गुंजा(३५) आमुल्ला कंप्पारिलथिप्पा(३७), अनिता पिटला सुधाकर(२१) आणि सुशीला इसाक तम्पिशेट्टी(३५) या चार जणांच्या मुसक्या काळाचौकी पोलिसांनी आवळल्या. हे सर्व आरोपी आंध्रप्रदेशातील आहेत.या टोळीने किती मोबाईल चोरले याची पोलीस चौकशी करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.