Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पितृपक्षात कावळे मिळणं दुरापास्त, मिश्रा महाराजांचे अनेक कावळे बनलेत दोस्त..

कावळ्याशी मैत्रीचं नातं, पितृपक्षात आल चर्चेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बुलढाणा 24 सप्टेंबर :-  दरवर्षी पितृपक्षात महत्त्व प्राप्त होते ते कावळ्यांना. आपल्या पूर्वजांच्या इच्छापूर्ती करून त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी पितृपक्षात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून कावळ्याकडे पाहिलं जातं. मात्र आजच्या कॉंक्रिटीकरणाच्या युगात हे कावळे सहजासहजी मिळणं दुरापास्त झालंय.असं सगळं होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील एक अवलिया गेल्या अनेक वर्षांपासून कावळ्यांसोबत आपलं अनोख नातं घट्ट करून आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या टेंभुर्णा गावातील हे आहेत मिश्रा महाराज हे कावळ्यांशी गेल्या अनेक वर्षापासून मैत्री करून आहेत. त्यांच्या एका आवाजाने कावळे धावत येतात. त्यांच्या एका हाकीला ते ओह देतात. कावळ्यांना खायला नित्य नियमाने मिश्रा महाराज धान्य पुरवतात, कावळ्यांनीही महाराजांना आपला जवळचा मित्र म्हणून स्वीकारल आहे. त्यामुळे कावळे आणि मिश्रा महाराज यांचं एक वेगळं नातं तयार झाल्याचं पहायला मिळते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई पुणे सारख्या काँक्रीटीकरणनाच्या शहरात पितृपक्षात कावळा शोधूनही सापडत नाही. मात्र अजूनही ग्रामीण भागात हे कावळे नित्यनियमाने पाहायला मिळतात. मिश्रा महाराजांनी तर या कावळ्यांशी मैत्री करून ठेवली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.