ओ.बी.सी. महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी सुवर्णसंधी: एकरकमी भरणा करणाऱ्यांना 50 टक्के व्याज सवलत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने (ओ.बी.सी. महामंडळ) थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना (OTS) जाहीर केली आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत लागू असणार आहे.
योजनेनुसार, ज्या लाभार्थ्यांनी थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम एकरकमी भरली, त्यांना थकीत व्याज रक्कमेत 50% सवलत देण्यात येईल. महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
ही योजना थकीत कर्जदारांसाठी मोठी संधी असून, एकरकमी परतफेड करून व्याजात मोठी सवलत मिळवता येणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 31 मार्च 2025 पूर्वीच या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.