Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाची आगेकूच

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर : 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला नुकतीच रंगतदार सुरुवात झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (ता. 19) बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील पुरुष गटात गोंडवाना विद्यापीठाने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. हे सर्व सामने लीग पध्दतीने चालणार असून उपांत्य व अंतिम सामने 21 फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, मुंबई विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक या संघांनी बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष गटात आपला विजय नोंदविला. तर महिला गटात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, एचएसएनसी विद्यापीठ, मुंबई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी आपल्या विजयाची नोंद केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ॲथलेटिक्सच्या पहिल्या सत्रातील स्पर्धेत 5 हजार मीटर या सामन्यातील मुलांच्या गटात राज तिवारी (मुंबई विद्यापीठ) प्रथम, किशोर मरकड (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) द्वितीय तर तृतीय क्रमांक सौरभ चव्हाण ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांनी पटकावून सामन्यामध्ये पकड घेतली. मुलींच्या गटात रिकी पावरा (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव) प्रथम, तेजस्विनी भामखणे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) द्वितीय तर मिताली भोयर (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांनी तृतीय स्थान पटकावून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उंच उडी स्पर्धेमध्ये महिला गटात समिक्षा अडसुळे (शिवाजी विद्यापीठ) प्रथम, सुजाता बाबर (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) द्वितीय तर अकांक्षा जगताप (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) तृतीय स्थानी राहिले. गोळा फेक स्पर्धेमधील पुरुष गटातील सामन्यांमध्ये प्रविण कुमार गुप्ता (मुंबई विद्यापीठ), प्रथम ऋषीकेश साखरे (शिवाजी विद्यापीठ) द्वितीय तर प्रफुल्ल थोरात (शिवाजी विद्यापीठ) यांनी तृतीय क्रमांक पटकावून आपले सपर्धेतील आपले स्थान निश्चित केले.

टेबल टेनिस स्पर्धेतील महिला गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र कृषी आणि मत्स विज्ञान विद्यापीठ नागपूर हे संघ आगेकूच करीत आहेत तर पुरुष गटात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, डॉ. होमीभाभा राज्य विद्यापीठ या संघांनी स्पर्धेतील आपले स्थान कायम राखले.

 

Comments are closed.